तळोजा (पनवेल) – येथील फेज २ येथील तळोजा रहिवासी संघाकडून एकत्रितरित्या श्रीरामनवमी सोहळा साजरा करण्यात आला.
संध्याकाळी ६ वाजता पारंपरिक वेशात महिला आणि पुरुष वर्गाने या परिसरात पालखीसह दिंडी काढली. यामध्ये केवळ वारकरी संप्रदायाची भजने गाण्यात आली.
सौजन्य : आवाज़_जनतेचा
यानंतर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या डाव्या बाजूच्या मैदानात कीर्तनकार ह.भ.प. गणेश महाराज पाठक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. या उत्सवाला १००० हून अधिक जण उपस्थित होते.
या उत्सवात येथील महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, दीक्षा फाउंडेशन विश्वस्त मंडळ (चॅरिटेबल ट्रस्ट), तळोजा रहिवासी संघ तळोजा फेज २, जय श्रीराम भजनी मंडळ, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तळोजा विभाग, श्री हनुमान ट्रस्ट आदी स्थानिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
हिंदु जनजागृती समितीने हिंदू एकतेच्या संदर्भातील बॅनर लावले !
या उत्सवात हिंदु जनजागृती समितीने हिंदू एकतेच्या संदर्भातील बॅनर लावले होते. ‘या बॅनरमुळे शोभा आली. सध्या हिंदू एकतेच्या गोष्टींची आवश्यकता असून पुढील वर्षी अजून असे बॅनर लावा’, असे आयोजकांनी सांगितले.