पुणे येथे ‘अर्ष’ नावाच्या केशकर्तनालयामध्ये हिंदु मुलीला धर्मांधांनी कलमा पढायला लावला !

मुलीचे बळजोरीने धर्मांधाशी लग्न आणि धर्मांतर !

(कलमा म्हणजे अल्लाचा गौरव करणारी विधाने)

उज्‍ज्‍वला गौड यांनी ‘सलून’च्या फलकाला काळे फासले

पुणे – कोथरूड येथील ‘अर्ष’ नावाच्या ‘युनिसेक्स सलून’मध्ये (पुरुष आणि स्त्री दोघांसाठी असलेल्या केशकर्तनालयामध्ये) एका हिंदु मुलीला त्या सलूनचे मालक जावेद आणि आरमान यांनी कलमा पढायला लावला. त्यानंतर मुलीचे बळजोरीने आरमानसोबत लग्न लावले आणि तिचे धर्मपरिवर्तन केले. तोंड बंद करण्यासाठी तिला १ लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. ‘सदर मुलांना आम्ही कोथरूड पोलिसांच्या हवाली केले आहे’, असे ‘भाजप महिला मोर्चा, पुणे’च्‍या सरचिटणीस सौ. उज्‍ज्‍वला गौड यांनी सांगितले. या वेळी अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्तेही या ठिकाणी उपस्थित होते. या वेळी उज्‍ज्‍वला गौड यांनी ‘सलून’च्या फलकाला काळे फासले आणि धर्मांधांना हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी चोप दिला.

संपादकीय भूमिका

पोलिसांचा धाक अल्प झाल्याने आणि धर्मांधांना कठोर शिक्षा होत नसल्याने हिंदु मुलींवर अत्याचार होत आहेत. धर्मांधांना पोलीस वठणीवर केव्हा आणणार ?