
नवी मुंबई – तुर्भे येथे ए.पी.एम्.सी. मार्केटलगतच्या महापालिकेच्या पदपथावर खोका व्यापार्यांनी अनधिकृत व्यापार चालू केला आहे. तेथे कोणतीही सुरक्षेची उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
येथे आंब्याच्या लाकडी पेट्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा व्यवसाय केला जातो. वर्ष २०२४ मध्ये येथे लागलेल्या आगीमुळे खोका व्यावसायिकांनी ए.पी.एम्.सी.च्या आवारात पेट्यांच्या खरेदी-विक्रीस बंदी घातली आहे. त्यामुळे २० हून अधिक खोका व्यावसायिकांनी ए.पी.एम्.सी. फळ मार्केट ते भाजी मार्केटपर्यंतच्या पदपथावर आंब्याच्या लाकडी पेट्यांची विक्री करणार्याचा व्यवसाय चालू केला होता.
यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यावर अतिक्रमणविरोधी विभागाने तात्पुरती कारवाई केली; पण नंतर डोळेझाक केली. येथे आगीपासून सुरक्षा होण्याच्या दृष्टीने उपायोजना केलेली नाही. येथे आग प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. आगीची बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
संपादकीय भूमिकायावर पालिका प्रशासन कधी नियंत्रण आणणार ? |