नागोठणे (जिल्हा रायगड) येथील पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांच्या शोधमोहिमेचे दायित्व झटकले !

  • नागरिक आणि पोलीस पाटील यांनी माहिती दिल्यावर करणार कारवाई !

  • हिंदुत्वनिष्ठांच्या तक्रारींचे आवेदन निकाली काढल्याची पोलिसांची पत्राद्वारे माहिती

प्रतिकात्मक छायाचित्र

नागोठणे (जिल्हा रायगड) – येथे बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य आढळून आलेले नाही. त्यांची माहिती देण्याविषयी पोलीस पाटील यांना पत्र पाठवण्यात आलेले आहे. घुसखोरांच्या वास्तव्याची माहिती मिळताच तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे, असे पत्र पोहवा नागोठणे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी एम्.व्ही. लागी यांनी वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बापू महाराज रावकर यांना पाठवले आहे. या पत्रात ‘हिंदुत्वनिष्ठांच्या तक्रारींचे आवेदन निकाली काढण्यात आले आहे’, असे सांगून पोलिसांनी स्वतःचे दायित्व झटकले आहे. (बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याचे दायित्व पोलीस पाटील आणि नागरिक यांना देऊन नामानिराळे रहाणारे पोलीस काय कामाचे ? – संपादक)

पत्रात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती मंच, नागोठणे आणि राष्ट्रीय वारकरी संप्रदाय यांची नावे देण्यात आली आहेत.

पाेलिसांनी तक्रारदार ह.भ.प. बापू महाराज रावकर यांना पाठवलेले पत्र

१. नागोठणे येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी ‘नागोठणे परिसरातील रहिवासी, कामगार, हातगाडी विक्रेते, फिरते विक्रेते यांचे आधारकार्ड पडताळून बांगलादेशी घुसखोरांची शोधमोहीम राबवावी’, अशी मागणी कोलाड पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती.

२. पोलिसांनी त्याची नोंद घेत गावातील नागरिकांना ‘बांगलादेशींची माहिती मिळाल्यास त्वरित कोलाड पोलीस ठाण्याला द्यावी’, असे आवाहन केले आहे.

३. ह.भ.प. बापू महाराज रावकर यांना पाठवलेल्या पत्रात पोलिसांनी म्हटले आहे की, नागोठणे येथील बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याविषयीचे तक्रारी आवेदन आम्हाला प्राप्त झाले आहे. त्यानुसार बांगलादेशींची माहिती नागोठणे पोलीस ठाण्याला कळवण्याविषयी जाहीर सूचना पत्रक सिद्ध केले असून ते नागोठणे येथे सार्वजनिक ठिकाणी चिकटवण्यात आले आहे.

४. नागोठणे रेल्वेस्थानकावर मालगाडीतून सिमेंट आणि इतर सामान उतरवण्यासाठी ठेकेदार दिनेश घाग यांच्याकडील १६ कामगार आणि कनसे इंटरप्रायझेस यांच्याकडील १६ कामगार हे मिरानगर अन् रामनगर येथे रहात आहेत. ते बिहार आणि उत्तरप्रदेश येथे रहाणारे असल्याचे त्यांच्या आधारकार्डवरून समजले, असे पोलिसांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.

५. हे कामगार बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशी घुसखोरांची शोधमोहीम पोलिसांनी राबवणे आवश्यक असतांना ते दायित्व इतरांवर ढकलणारे पोलीस निष्क्रीयच होत ! उद्या बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण वाढून कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास त्याला उत्तरदायी कोण ?
  • बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याचे दायित्व आणि कर्तव्य पोलिसांचे आहे, हे त्यांच्या कधी लक्षात येणार ?