सुख-दुःख

१. आपल्याला ‘संसार असत्य आणि दुःखदायक आहे’, याची जाणीव असते, तरीही आपण त्याचा त्याग करू शकत नाही. ‘ईश्वर आपला आहे आणि तो सुखाचे आगार आहे’, असे आपण मानतो, तरीही त्याच्यावर प्रेम करू शकत नाही; कारण आपण संसारातून सुखाची अपेक्षा करत रहातो अन् सर्वशक्तीमान ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाही.

२. ‘मनुष्याची सुखाविषयीची आसक्ती जावी’, यासाठी त्याच्या जीवनात देवाच्या नियोजनानुसार पुनःपुन्हा दुःख येते.

३. जो स्वतःला मिळणार्‍या सुख-दुःखासाठी अन्य मनुष्य, प्राणी किंवा वस्तू यांना कारणीभूत मानतो, त्याचे सर्व प्रकारे पतन होते; कारण तो जे प्राणी किंवा वस्तू यांना सुखाचे कारण मानतो. त्यांच्याविषयी त्याच्या मनात प्रेम (आसक्ती) निर्माण होते आणि तो ज्यांना दुःखाचे कारण मानतो, त्यांच्याविषयी त्याच्या मनात द्वेष निर्माण होतो.

– ब्रह्मलीन श्रद्धेय स्वामी श्रीशरणानंदजी महाराज यांच्या प्रवचनातून संकलित (साभार : मासिक ‘कल्याण’, फेब्रुवारी २०२२)