१६ जणांना वाचवण्यात यश

चमोली (उत्तराखंड) – बद्रीनाथ धाम येथील माना गावाजवळ हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. यातील १६ कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे, तर अन्य कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. उत्तराखंडच्या काही भागांत चालू असलेल्या बर्फवृष्टीमुळे ही घटना घडली. सर्व कामगार भारतीय सैन्याच्या ‘बीआर्ओ’शी (‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’शी – सीमा रस्ते संघटनेशी) करार केलेल्या कंत्राटदाराचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, बचाव पथकांकडून साहाय्य कार्य चालू आहे. सर्व कामगार बांधवांच्या सुरक्षेसाठी मी भगवान बद्री विशालकडे प्रार्थना करतो.