Delhi Assembly : नजफगडचे ‘नाहरगड’, तर महंमदपूरचे नामकरण ‘माधवपूरम्’ करा ! – भाजप

भाजपच्या आमदारांची देहली विधानसभेत जोरदार मागणी

देहली विधानस

नवी देहली – राजधानी देहलीत भाजपचे सरकार आल्यापासून तेथील विविध भागांची मुसलमान नावे पालटण्यासाठी मागणी जोर धरत आहे. आमदार नीलम पहेलवान यांनी ‘नजफगड’चे नाव पालटून ‘नाहरगड’ करण्याचा प्रस्ताव देहली विधानसभेत मांडला आहे. यासमवेतच आमदार अनिल शर्मा यांनी ‘महंमदपूर’ गावाचे नाव पालटून ‘माधवपूरम्’ करण्याची मागणी केली. काही कालावधीपूर्वी आमदार मोहन सिंह बिष्ट यांनी ‘मुस्तफाबाद’चे नाव पालटून ‘शिवपुरी’ किंवा ‘शिव विहार’ करण्याची मागणी केली होती.

नजफगडच्या आमदार नीलम पहेलवान म्हणाल्या की, औरंगजेबाने ‘नहरगड’वरून नजफगड असे नाव पालटून टाकले होते. मी यासाठी अनेक वेळा तत्कालीन खासदार  (सध्याचे उपमुख्यमंत्री) प्रवेश वर्मा यांना आवाहन केले होते.

संपादकीय भूमिका

  • यासमवेतच देहलीचे नामकरण ‘इंद्रप्रस्थ’ करण्यासाठी हिंदु जनतेने मागणी करून ती लावून धरली पाहिजे !
  • एकेका राज्यातील आमदारांनी इस्लामी आक्रमणकर्त्यांच्या नावांनी असलेली गावे, शहरे, जिल्हे आदींना हिंदु नावे देण्याची मागणी करत बसण्यापेक्षा एकदाचे केंद्र सरकारनेच त्या दिशेने अध्यादेश प्रसारित करून समस्त हिंदु जनतेच्या मागणीला पूर्णविराम लावून इतिहासाला न्याय दिला पाहिजे !