|
अहिल्यानगर – जिल्ह्यातील मढी येथील नवनाथांपैकी एक असणारे कानिफनाथ महाराज यांची यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालू असते. साधारण मार्च महिन्यात ही यात्रा भरते. या यात्रेविषयी ग्रामसभा झाली. मढी यात्रेत मुसलमान व्यापार्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी पत्रे विविध गावांतून आली होती. या पत्रांची नोंद घेत ग्रामसभेपुढे सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड यांनी हा विषय मांडला. मढी येथे येणारे व्यापारी परंपरा पाळत नाहीत, तसेच मटका आणि जुगार खेळतात. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावतात, हे सूत्र उपस्थित करण्यात आले. प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात काही ठिकाणी मुसलमान व्यापार्यांवर बंदी घालण्यात आली. तशी बंदी मढी यात्रेत मुसलमान व्यावसायिकांवर घालण्यात यावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे. त्यानुसार ग्रामसभेच्या ठरावात मुसलमान व्यापार्यांवर मढी यात्रेमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच मरकड यांनी सांगितले.
In Madhi, Maharashtra, the Gram Sabha has passed a resolution to ban non-Hindu traders during the Kanifnath Maharaj’s yatra. 🙏
The move aims to curb illegal activities like matka and gambling, often linked to outside traders during the festival. 🚫
It is worth contemplating,… pic.twitter.com/gWiJ8QTgWM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 24, 2025
पारंपरिक पद्धतीनुसार देवाला महिनाभर अगोदर तेल लावलेले असते. हा कालावधी मढीच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने दुखवट्याचा असतो. या काळात ग्रामस्थ तळणे, लग्नकार्य, शेतीकामे, प्रवास असे कार्य पूर्णपणे बंद करून घरामध्ये पलंग, तसेच गादीही वापरत नाहीत. महिनाभर सर्व कौटुंबिक कामे बंद ठेवून सर्व ग्रामस्थ नाथांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देतात.
भाविकांनी दिलेल्या पत्रातील सूत्रे !१. जी व्यक्ती कपाळावर कुंकू लावत नाही, त्याच व्यक्तीने हिंदूंना कुंकू विकणे, हे हिंदु धर्मासाठी दुर्दैवी आहे. २. मुसलमान समाजाकडून खाद्यपदार्थ आणि प्रसाद यांचे साहित्य वेगवेगळ्या प्रकारे दूषित केलेले असते. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात. |
संपादकीय भूमिका
|