अहिल्यानगरमधील कर्जत तालुक्यातील २ पशूवधगृहांवरील धाडीत २१ गोवंशियांची सुटका !

एकाला अटक; ३ जण पसार

अहिल्यानगर – कर्जत तालुक्यातील येसवडी आणि राशीन शिवारातील २ पशूवधगृहांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घातली. त्यात ६ लाख ४५ सहस्र रुपयांच्या २१ गोवंशियांची सुटका करण्यात आली. एका आरोपीला कह्यात घेतले असून ४ जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहेत. येरवडी गावाच्या शिवारात प्रमोद साळवे याच्या पत्र्याच्या गोठ्यावर धाड घालून १३ जिवंत गोवंशियांना डांबून ठेवल्याचे आढळले. या प्रकरणी इरफान कुरेशी, बबलू कुरेशी आणि प्रमोद साळवे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. (प्रमोद साळवे नावाच्या व्यक्तीच्या घरात गोवंश डांबून ठेवला जातो, हे लज्जास्पद आहे ! गोवंशियांच्या हत्येसाठी जर धर्मांधांना साळवेसारखे लोक साहाय्य करत असतील, तर यासारखी संतापजनक गोष्ट कुठली नाही ! – संपादक)

घटनास्थळावरून ते ३ जण पळून गेले. राशीन येथील कुरेशी मोहल्ल्यात धाड घालून वसीम कुरेशी याच्या कह्यातून ८ गोवंशियांची सुटका करण्यात आली. कुरेशी याला कह्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गोवंश हत्याबंदी कायद्याचेही भय वाटत नसल्यानेच धर्मांध सर्रासपणे गोहत्या करण्यास धजावतात ! अशा घटना थांबवण्यासाठी धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक)