एक संशयित कह्यात !
पिंपरी – म्हाडाची सदनिका मिळवून देण्याचे आमीष दाखवून ६०० जणांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी प्रतीक धाईंजे याला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध चालू आहे. प्रतीकने म्हाडाचे बनावट लेटरहेड, तसेच म्हाडाची लॉटरी आणि इतर माहितीच्या संदर्भात लेखी पत्र देऊन नागरिकांची २२ लाख ४१ सहस्र रुपयांची फसवणूक केली. हक्काच्या घरासाठी अनेकांनी पैसे दिले. म्हाडाच्या बनावट लेटरहेडवर घर मिळाल्याचे त्याने अनेकांना लिहून दिले होते; मात्र प्रतीकने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर ७५ नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या वाढू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे.
संपादकीय भूमिकानागरिकांना फसवून त्यांच्याकडून पैसे लुबाडणार्या आरोपीकडून सर्व निधी सव्याज वसूल करायला हवा ! |