शांत आणि समाधानी वृत्तीच्या फोंडा (गोवा) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) दमयंती वालावलकर (वय ८० वर्षे) !

फोंडा (गोवा) येथील श्रीमती दमयंती वालावलकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचे १०.२.२०२४ या दिवशी निधन झाले. ३०.१.२०२५ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी सौ. सीमा सामंत यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

(कै.) श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर

१. शांत स्वभाव 

‘आईचा (श्रीमती दमयंती वालावलकर यांचा) स्वभाव पहिल्यापासूनच पुष्कळ शांत होता. ती कधीच कुणाला मोठ्याने किंवा रागाने बोलली नाही. तिला राग आला, तरी ती शांत रहायची.

सौ. सीमा सामंत

२. समाधानी वृत्ती 

पहिल्यापासूनच आमचे एकत्रित आणि मोठे कुटुंब होते. माझे वडील आणि काका यांची मिळकत अल्प होती. आईने स्वतःची हौस-मौज कधीच केली नाही किंवा त्याबद्दल कधी गार्‍हाणे केले नाही. ती जे आहे, त्यात समाधान मानून आनंदी रहात असे.

३. परिस्थिती स्वीकारणे 

ती कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेत असे. आम्हाला काही कामासाठी बाहेरगावी जायचे असेल, तर ती आमच्या नातेवाइकांकडे रहायला जात असे.

४. ती प्रत्येक कृतीचे पूर्वनियोजन करत असे, उदा. दिवाळीचा सण, प्रवास इत्यादी.

५. ती सनातनचे ग्रंथ आणि दैनिक अन् साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांचे नियमित वाचन करत असे.

गुरुदेवांनी माझ्याकडून आईची गुणवैशिष्ट्ये लिहून घेतल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. सीमा सामंत (कै. (श्रीमती) दमयंती वालावलकर यांची मुलगी), फोंडा, गोवा. (२०.१.२०२५)