नाशिक – येथील ऐतिहासिक रामकुंडातील काँक्रिटीकरण काढण्याविषयी प्रशासनाने सखोल अभ्यासानंतर निर्णय घेण्याचे ठरवले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या काँक्रिटीकरणामुळे जिवंत पाण्याचे झरे बुजवल्याचा दावा केला जात आहे. असे असले, तरी काँक्रीटीकरण काढल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील निर्णय तज्ञांच्या मतानुसार घेतला जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पहाणी केल्यानंतर अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.