इहलोक आणि परलोक दोन्ही ठिकाणी मान्य असणारी राज्यघटना हवी ! – शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

प्रयागराज (उत्तरप्रदेश), २५ जानेवारी (वार्ता.) – यमराजाला मान्य होईल अशी राज्यघटना हवी. मनृस्मृतीची राज्यघटना परमेश्‍वरालाही मान्य आहे. वैदिक राज्यघटना अशी आहे की, जी यमराज आणि धर्मराज दोघांनाही मान्य आहे. राज्यघटना अशी हवी की, जी इहलोक आणि परलोक दोन्ही ठिकाणी मान्य असेल. व्यक्तीच्या प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचे नियमन या राज्यघटनेनेच होईल. ‘धर्मनिरपेक्ष’ हा केवळ शब्द आहे, असे मार्गदर्शन पुरी येथील पूर्वाम्नाय श्री गोवर्धनपीठाचे शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती यांनी कुंभनगरीत प्रवचन करतांना केले.