
संतवाङ्मय हे अन्न आणि निद्रे एवढेच महत्त्वाचे आहे; कारण त्याने विचार शुद्ध होतात. आज प्रत्येक जण भौतिक सुखाच्या मागे लागून आरोग्य हरवून बसला आहे! आरोग्याचा घात करून भौतिक सुखही पूर्णांशाने भोगता येत नाही म्हणून संतवाङ्मय संयम शिकवते आणि तो शिकला पाहिजे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘आमचे अप्पा, आमचे स्वामी’, या ग्रंथातून)