चित्तात सूक्ष्मरूपे वास करते ‘चित्‌शक्ति’ माता ।

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

घोर कलियुगात हिंदु राष्ट्र अवतरण्या गुरुदेवांनी (टीप १) संकल्प केला ।
या संकल्प पूर्ततेसाठी भू-देवीने ‘चित्‌शक्ति’रूपे (टीप २) अवतार धारण केला ।। १ ।।

सप्तर्षींच्या आज्ञेने देवतांच्या आशीर्वादास्तव तू पृथ्वी पादाक्रांत केली ।
हिंदु राष्ट्राच्या निर्मितीची पताका सूक्ष्मरूपी अडथळ्यांवर मात करून पुढे नेली ।। २ ।।

श्री. अविनाश जाधव

हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यासाठी तू दक्षिणेत वास करिशी ।
दूर असूनही साधक जनांच्या चित्ते वसून तू सूक्ष्मरूपे ठाव घेशी ।। ३ ।।

चित्‌शक्ति मातेचा स्थुलातील सहवास सर्वांना हवासा वाटतो ।
म्हणूनच दूर असूनही मातेचा सहवास सर्वांना समीप भावतो ।। ४ ।।

तूच वाराही (टीप ३), तूच श्रीशैली, तूच सरस्वती या विश्वाची तू जननी ।
रज-तम वृत्तींचा सूक्ष्मरूपे बीमोड करण्या अवतरली तू या अवनी ।। ५ ।।

आम्हा पामर साधकरूपी मुलांवर आई तुझा सदैव आशीर्वाद असावा ।
चित्ताला स्थिर करून आमचा हा जीव श्री गुरुचरणी सत्वर अर्पण करावा ।। ६ ।।

केवळ हीच प्रार्थना वाढदिवसाच्या या शुभदिनी तव चरणा ।
तव चरणा….।।

टीप १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

टीप २ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

टीप ३ – श्रीविष्णूच्या वराह अवतारात भू-देवीने पत्नी रूपात अवतार धारण केलेले रूप

।। श्रीविष्णुर्पणमस्तु ।।

– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१२.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक