१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील प्रेमभावामुळे ‘त्या आई आणि मैत्रीण आहेत’, असे वाटणे
‘माझ्या आईपेक्षा अधिक प्रेम करणारी कुणी असेल, तर त्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ होय. माझ्या आईचे निधन झाल्यावर ‘मी तिला विसरू शकणार नाही’, असे मला वाटले होते; मात्र श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या सत्संगामुळे मला एकही दिवस आईची उणीव भासली नाही. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ केवळ माझी आई नसून माझ्या सर्वांत चांगली मैत्रीण आहेत. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासारखी प्रेमळ व्यक्ती अन्य कुणी असूच शकत नाही. त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेच अहं दिसून येत नाही. आपण त्यांच्या सहवासात असतांना प्रत्येक क्षणी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकू शकतो.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या वागण्यातील सहजता आणि अहंशून्यता
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ अत्यंत मोकळ्या मनाच्या आहेत. त्यांच्यामुळे समोरची व्यक्तीही मनमोकळेपणाने बोलते. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या वागण्यात इतकी सहजता आहे की, ‘त्या गुरु आहेत’, हे कुणाच्या लक्षातही येणार नाही.
त्या आमच्या घरी येतात. तेव्हा त्या स्वयंपाकही करतात. माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळी मला सांगतात, ‘‘तुम्ही सुगरण आहात.’’ तेव्हा मी त्या सर्वांना अभिमानाने सांगते, ‘‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामुळेच मी चांगला स्वयंपाक करू शकते.’
– (पू.) सौ. माला कुमार (सनातनच्या ११६ व्या [समष्टी] संत, वय ७० वर्षे), बेंगळुरू (२२.११.२०२४)