‘१६.८.२०२४ या दिवशी मी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हस्ताक्षर असलेले कागद आणि सनातन संस्थेेची माहितीपत्रके (ब्रोशर्स)’ यांची जिल्ह्यांतून आलेल्या मागणीनुसार वर्गवारी करण्याची सेवा करत होते. तेव्हा एक फुलपाखरु अनुमाने दुपारी ३ वाजल्यापासून रात्री १०.३० वाजेपर्यंत तेथे बसले होते. मी सेवा थांबवून निघाले, तरीही ते पटलावर शांतपणे बसले होते.
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/10/08204106/2024_Aug_Nalini_Raut_S_C.jpg)
मी सेवा करत असतांना माझ्याकडून होत असलेल्या हालचाली किंवा आवाज यांचा फुलपाखरावर काहीच परिणाम झाला नाही. ते ध्यानस्थ बसल्यासारखे वाटत होते.
त्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हस्ताक्षर असलेले कागद आणि सनातनची माहितीपत्रके’ यांतील चैतन्यामुळे फुलपाखराचे ध्यान लागले असावे’, असे मला जाणवले.
माझी गुरुमाऊलींच्या प्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती) कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.’
– सुश्री (कु.) नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |