१. संतांवर लोक प्रेम करतात; कारण त्यांचे देह प्रेममय असतात. संतांचे देह मऊ लुसलुशीत असतात; कारण त्यांच्या मनाची मृदुता पराकोटीची असते.
२. वेदांतावर चर्चा करता आली, ‘वेद जाणला’, असे वाटले, तरी देहबुद्धीचा अभिमान धरू नये; कारण वेद ही ईश्वराचीच निर्मिती आहे आणि जाणवून देण्याची प्रक्रियाही ईश्वरच करतो.
३. अतीवाचनाने आत्मा रक्तबंबाळ होतो.
४. स्वामीचरण दृढ धरल्यावर व्यवहारातील दैन्य नाहीसे होऊन अन्य कुणाच्या चरणी लागावे लागत नाही.
५. सगुण हे निर्गुणासाठी आहे आणि निर्गुण हे सगुणासाठी आहे. एकूण सगुण आणि निर्गुण यांच्या संदर्भात केलेल्या खटाटोपातून शून्यावस्थेची प्रचीती येते.
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)