‘मी रामनाथी आश्रमातील साधकांवर बिंदूदाबन उपचार करतो. मी काही दिवसांपासून श्री. घनश्याम गावडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५१ वर्षे) यांच्यावर बिंदूदाबनाचे उपचार करत होतो. त्यांच्यावर उपचार करतांना मला अतिशय उत्साह वाटायचा. याविषयी एकदा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना सांगितले. त्या वेळी आम्हा दोघांत झालेला संवाद पुढे देत आहे.
श्री. चेतन परब : गेल्या काही दिवसांपासून श्री. घनश्याम गावडे यांच्यावर बिंदूदाबन करतांना मला चांगले जाणवायला लागले आणि माझी सकारात्मकता वाढली. त्यांच्यावर बिंदूदाबन उपचार करण्याचा माझा एकही दिवस चुकत नाही. मी पुष्कळ आधीपासून बिंदूदाबन करतो; पण मला एवढी सकारात्मकता कधी जाणवली नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : त्यांच्यातील चांगली शक्ती तुम्हाला मिळत आहे. त्यांचा आनंद, भाव, त्यांच्यातील सकारात्मक शक्ती इत्यादी तुम्ही त्यांच्या शरिराला स्पर्श करता, बिंदूदाबन करता, तेव्हा ते तुम्हाला प्राप्त होतात. तेव्हा तुमचा नामजप चालू असतो कि नाही ?
श्री. चेतन परब : तेवढा चालू नसतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : असे नको. या वेळी त्यांची साधना चांगली आहे; म्हणून ठीक आहे. दुसर्या कुणावर बिंदूदाबनाचे उपचार करतांना मात्र नेहमी नामजप चालू असला पाहिजे; कारण बर्याच जणांना वाईट शक्तींचे त्रासही असतात. ‘त्या शक्तींनी आपल्याला त्रास द्यायला नको’, याची काळजी आपण घ्यायला हवी.
हे लिखाण करून घेतले, यासाठी मी श्री गुरुदेवांप्रती कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. चेतन परब (वय ४८ वर्षे) , फोंडा, गोवा.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |