मंगळुरू येथील सनातनच्या १३१ व्या संत पू. (सौ.) शशिकला किणी (वय ७८ वर्षे) यांचे पती श्री. विठ्ठल किणी (वय ७९ वर्षे) यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे २१ नोव्हेंबर २०२४ या दिवशी घोषित करण्यात आले. त्यानिमित्त सनातनच्या साधिका सौ. मंजुळा रमानंद गौडा यांना लक्षात आलेली श्री. किणी यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. पत्नीला साहाय्य करणे
‘श्री. विठ्ठल किणीकाका यांची पत्नी सौ. शशिकला किणी (आताच्या पू. (सौ.) शशिकला किणी ) यांना वयोमानानुसार आजार असल्याने घरकाम करण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे काका पत्नीला घरातील कामात सर्वतोपरी साहाय्य करतात.
२. प्रेमभाव
साधक काकांच्या घरी गेल्यावर ते साधकांना खाऊ देतात, तसेच ते साधक आणि सेवाकेंद्रातील साधक यांच्यासाठी त्यांच्या घरी सणासाठी बनवलेले पदार्थ पाठवतात.
३. लहानपणापासून केलेली साधना
काकांचा जन्म मुल्की येथील व्यंकटरमण मंदिराच्या आवारातील घरी झाला. ते सतत भगवान नृसिंहाचे स्मरण करत असत. काका गेल्या १५ वर्षांपासून अखंडपणे भगवान नृसिंहाचा नामजप करत आहेत. ‘परिस्थिती कितीही कठीण असली, तरी भगवान नृसिंह माझ्या पाठीशी आहे’, अशी त्यांची श्रद्धा आहे. ते १८ – १९ वर्षांचे होईपर्यंत प्राणायामासह गणपतीचा जप करायचे. त्यांनी ४० वर्षे ‘ललितासहस्रनामा’चे पठण केले. अशा प्रकारे ते लहानपणापासूनच देवाचे सतत स्मरण करत असत.
४. स्तोत्राचे पठण मानसपूजेच्या स्वरूपात करणे
काका प्रतिदिन त्रिशास्तीदेवी स्तोत्राचे पठण करतात. हे पठण ते मानसपूजेच्या स्वरूपात करतात. ते प्रत्येक बीजमंत्र म्हणत असतांना तिरुपति व्यंकटरमण, काठमांडू येथील शिवमंदिर, सुब्रह्मण्य, धर्मस्थळ, मंजेश्वर, अशा सर्व मंदिरांतील देवतांचे मानसदर्शन घेतात. नंतर राम, कृष्ण, मारुति, गणपति, मुल्की येथील श्री नृसिंहस्वामी, नवदुर्गा आणि कुलदेवता यांना आवाहन करून अभिषेक करतात. ते देवतांना नैवेद्य दाखवतात. अशा रितीने ते करत असलेल्या भावपूर्ण मानसपूजेतून त्यांना आनंद मिळतो.
५. संतांप्रतीचा भाव
एकदा पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४८ वर्षे) काकांच्या घरी येणार होते. तेव्हा काका त्यांची वाट पहात बसले होते. काका त्यांच्याशी बोलतांना म्हणाले, ‘‘संतत्व हा मोठा टप्पा आहे. तुम्ही तो साध्य केला आहे.’’ काकांनी पू. अण्णांना हात जोडून वंदन केले. तेव्हा काकांची भावजागृती झाली.’
– सौ. मंजुळा रमानंद गौडा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४३ वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (७.५.२०२४)