‘माझी आई गेली १७ वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधना करत आहे. तिचा कल हा नेहमी सेवा परिपूर्ण करण्याकडे असतो. माझ्या आईकडे पुष्कळ सेवांचे नियोजन आणि दायित्व असते. काही वेळा इतरही पुष्कळ सेवा तिच्याकडे येतात. गुरुकृपेने तिने त्या सर्व सेवा व्यवस्थित केल्या आहेत. आईमुळेच मीही सनातन संस्थेमध्ये छोट्या छोट्या सेवा करत आहे. ‘कुठलाही प्रसंग स्वीकारण्याच्या गुणांमुळेच माझ्या आईची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के झाली आहे’, असे मला वाटते. कृतज्ञता !’
– श्री. कौशिक नेरलेकर (श्रीमती नेरलेकर यांचा मुलगा), सिंहगड रस्ता, पुणे. (२०.४.२०२४)