रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. सागर ए. शिंदे, कोरेगाव (जि. सातारा), महाराष्ट्र.

अ. ‘मला आश्रमातील सर्व साधकांविषयी अधिकच आपुलकी आणि प्रेमभाव वाटला.

आ. आश्रम पहातांना मी पूर्णवेळ निर्विचार झालो आणि माझी भावजागृती होऊन मी निःशब्द झालो.’

२. श्री. गजानन यशवंत फडतरे, खातवळ, (ता. खटाव, जि. सातारा), महाराष्ट्र.

अ. ‘नेहमी काही चांगले पहातांना केवळ डोळे समाधानी होतात; पण आश्रमात आल्यावर मन समाधानी झाले.’

३. श्री. विनायक सदाशिव येडके, सांगली 

अ. ‘ही एका नव्या विश्वाची निर्मितीच आहे.

आ. ‘आपले हिंदुत्व किती श्रेष्ठ आणि महान आहे’, याची प्रचीती येथे अनुभवता आली.’

४. श्री. प्रदीप निवृत्ती मोरे, मांडवे, जि. सोलापूर.

अ. ‘आश्रम पाहून पुष्कळ चांगले वाटले.

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेले अभिप्राय

१. श्री. सागर ए. शिंदे 

अ. ‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन हे बुद्धीपलीकडचे आहे.

आ. प.पू. सद्गुरूंनी या जिवाचा उद्धार करावा आणि माझ्याकडून तशी कृती करून घ्यावी.’

२. श्री. विनायक सदाशिव येडके, सांगली 

अ. ‘अनिष्ट शक्तींना आपणच खत-पाणी घालतो. आपण आपली संस्कृती जपत नाही. ‘नामजप करणे, योग्य कपडे आणि योग्य आचरण’, हे पुष्कळ आवश्यक आहे. तसे न केल्यास समाज रसातळाला जाईल.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २८.६.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक