Shahbaz Sharif Congratulated Trump On ‘X’ : पाकमध्ये ‘एक्स’वर बंदी असतांना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ‘एक्स’वरून ट्रम्प यांचे केले अभिनंदन !

पाकिस्तान्यांकडून होत आहे विरोध !

डॉनल्ड ट्रम्प व शाहबाज शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – डॉनल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय झाल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांचे ‘एक्स’वर पोस्ट करून अभिनंदन केले. ‘एक्स’वर पाकिस्तानमध्ये बंदी आहे. विशेष म्हणजे शाहबाज शरीफ सरकारनेच ही बंदी घातली होती. आता शाहबाज यांच्याकडूनच या बंदीचे उल्लंघन करून ट्रम्प यांचे अभिनंदन केल्यावर त्यांच्यावर पाकिस्तानी नागरिकांकडून टीका करण्यासह कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला जात आहे. शरीफ यांनी पोस्टसाठी ‘व्ही.पी.एन्.’ प्रणालीचा वापर केला.

सामाजिक माध्यमांत पंतप्रधान शरीफ यांच्यावर टीका करतांना एकाने लिहिले, ‘‘मिस्टर ट्रम्प, हा जोकर तुमचे अभिनंदन करण्यासाठी व्ही.पी.एन्. वापरत आहे. इलॉन मस्क (‘एक्स’चे मालक), पाकिस्तानमध्ये ‘एक्स’वर बंदी घालण्यात आली आहे.’’

संपादकीय भूमिका

  • स्वतःच बंदी घालायची आणि स्वतःच त्याचे उल्लंघन करायचे ! असे पंतप्रधान देशाला कायद्याचे राज्य कधीतरी देऊ शकतात का ?
  • पाकने ट्रम्प यांचे कितीही अभिनंदन केले, तरी पाकला त्याचा काहीही लाभ होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवावे !