काय वर्णावी आमच्या गुरूंची थोरवी ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी काव्य – ‘साधना’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

काय वर्णावी आमच्या गुरूंची महती ।
प्रत्यक्ष श्रीविष्णु अवतरला भूवरी (टीप १) ।। १ ।।

साधनेची मूलभूत तत्त्वे (टीप २) ।
सहज भिनवी साधकांमध्ये ।। २ ।।

विविध सेवांची निर्मिती करूनी (टीप ३) ।
साधकांना सहज घडवी ।। ३ ।।

स्वभावदोष अन् अहं यांचे धोंडे ।
आपल्या प्रीतीमय वाणीने सहज फोडे ।। ४ ।।

सतत प्रेरणा देऊनी श्रद्धा भाव वाढवी ।
व्यष्टी-समष्टी साधनेचे धडे गिरवून घेई ।। ५ ।।

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

आपल्या दिव्य संकल्पाने साधकांना ।
जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवी (टीप ४) ।। ६ ।।

पदोपदी मार्गदर्शन करूनी ।
संत नि सद्गुरु पदी विराजमान करी (टीप ५) ।। ७ ।।

ऐशा महान गुरूंची थोरवी काय वर्णावी ।
अल्प पडे मती माझी अल्प पडे गती ।। ८ ।।

इदं न मम ।
सच्चिदानंद परब्रह्म गुरु चरणार्पणमस्तु ।

टीप १ – सप्तर्षि ‘जीवनाडीपट्टी’, तसेच विविध नाडीभविष्य ग्रंथांमध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे सांगितले आहे.

टीप २ – साधनेची मूलभूत तत्त्वे – आवड आणि क्षमता यांनुसार साधना, अनेकातून एकात जाणे, स्थुलाकडून सूक्ष्माकडे जाणे, पातळीनुसार साधना, वर्णानुसार साधना, आश्रमानुसार साधना आणि काळानुसार साधना

टीप ३ – सेवा हे साधना करण्याचे माध्यम आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांची साधना व्हावी; म्हणून साधकांच्या प्रकृतीनुसार, कौशल्यानुसार, वयोमानानुसार, तसेच साधनामार्गानुसार त्यांच्या साधनेसाठी आवश्यक अशा अनेक सेवांची उपलब्धता करून दिली आहे.

टीप ४ – सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली गुरुकृपायोगानुसार साधना करून २६.७.२०२४ पर्यंत १ सहस्र ४० साधक ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा टप्पा गाठून जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून सुटले आहेत.

टीप ५ – सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली गुरुकृपायोगानुसार साधना करून २६.७.२०२४ पर्यंत १२८ साधक संत झाले आहेत.

– सद्गुरु राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.७.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील
    म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक