फुंकले रणशिंग करूनी हिंदु राष्ट्राचा निर्धार ।
म्हणूनी पृथ्वीतलावर होऊ घातले रामराज्य साकार ।। १ ।।
गुरुवर्य (टीप) आमुचे साक्षात् श्रीमन्नारायणाचे अवतार ।
अनंत जन्माची पुण्याई म्हणून लाभले आम्हा गुरुवर्य थोर ।। २ ।।
अष्टांग साधना करत शिष्यगण गाठती मोक्षद्वार ।
अखिल विश्वात साधक करती अध्यात्मप्रसार ।। ३ ।।
आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी व्यक्त करतो ।
कोटी कोटी कृतज्ञता अन् साष्टांग नमस्कार ।। ४ ।।
टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– श्री. विलास श्रीराम सावरकर (वय ५६ वर्षे), अमरावती (१२.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |