कावड यात्रेच्या वेळी हिंदूंना मज्जाव केल्याने आता बरेली (उत्तरप्रदेश) येथील हिंदूंनी घेतली रोखठोक भूमिका !
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे १५ सप्टेंबरच्या रात्री उशिरा येथील जोगी नवादा या भागात ‘जुलूस-ए-महंमदी’ नावाने मुसलमानांनी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक ४ अंजुमन (छोट्या मिरवणुका) एकत्र होऊन मोठी झाली. यामध्ये कधीच न लावण्यात आलेले ‘डीजे’ (मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा) लावले होते. ५०० हून अधिक मुसलमानांची ही मिरवणूक मौर्या गल्लीतून जात असतांना हिंदूंनी त्यास जोरदार विरोध केला. पोलिसांनी मिरवणुकीतील डीजे काढून टाकले. तरीही हिंदूंनी या मिरवणुकीला ‘अपारंपरिक’ म्हणत त्यास विरोध केला. हिंदूंच्या प्रखर विरोधासमोर पोलिसांनी नमती भूमिका घेत मिरवणुकीतील मुसलमानांची संख्या अल्प करण्याचा आदेश दिला. यावर मुसलमानांनी थयथयाट केला. यानंतर हिंदूंनी पोलिसांवर इमारतींच्या गच्चींवरून पाणी फेकले. या वेळी दोन्ही गटांकडून धार्मिक घोषणा दिल्या जात होत्या. रात्री २.१५ पर्यंत मुसलमानांची मिरवणूक पुढे सरकली नाही.
Won’t let Mu$l!m$ take out E!d procession. – Hindus in Bareilly
Hindus unite to give a befitting reply to Mu$l!m$ for their Kavad yatra nuisance.
It is imperative for Hindus to speak against the injustice, and Hindus across the nation should learn from this incident.
It won’t… pic.twitter.com/2SHNDqOm3o
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 16, 2024
ईदच्या वेळी ही मिरवणूक प्रतिवर्षी निघते; मात्र यामध्ये त्यांची संख्या मर्यादित असते, तसेच येथे डीजे लावण्याची परंपरा नाही. गेल्या महिन्यात झालेल्या कावड यात्रेच्या वेळी हिंदूंनी डीजे लावल्यावरून मुसलमानांनी त्यास ‘अपारंपरिक’ ठरवत तीव्र आक्षेप घेतला होता. त्यामुळेच आता हिंदूंनी ‘जशास तसे’ म्हणून हा विरोध केला आहे, असे म्हटले जात आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनी त्यांच्यावरील अन्यायाच्या विरुद्ध बोलणे अत्यंत आवश्यक असून भारतभरातील हिंदूंनी या घटनेतून बोध घेतला पाहिजे. हिंदूंवर अशी भूमिका घेण्याची वेळ का आले ? निधर्मीवाद्यांना मात्र हे रूचणार नसल्याने त्यांनी हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हणून हिणवून उपदेशाचे डोस पाजल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |