ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात कट्टरवादी इस्लामचे समर्थक जमात-ए-इस्लाम पक्षाने रवींद्रनाथ टागोर लिखित ‘अमार सोनार बांगला’ हे राष्ट्रगीत पालटण्याची मागणी केली आहे; मात्र सरकारच्या धार्मिकविषयक प्रकरणांचे मंत्री खालिद हुसैन यांनी राष्ट्रगीत पालटण्याची मागणी फेटाळली आहे. असे असले, तरी अंतरिम सरकारने राज्यघटना पालटण्यासाठी सैन्याधिकार्यांची समिती स्थापन केली आहे.
राष्ट्रगीत पालटण्याच्या मागणीला विरोध
४ सप्टेंबरला जमात-ए-इस्लामचे माजी प्रमुख गुलाम आझमचा मुलगा अब्दुल्ला अमन आझमी याने ‘बांगलादेशाचे राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राज्यघटना पालटण्याची आवश्यकता आहे’, असे विधान केले. कट्टरतावादी जमातच्या या मोहिमेला बांगलादेशामध्ये विरोध होत आहे. कलाकारांचा गट ‘उदिची’च्या शेकडो कलाकारांनी बांगलादेशाचे राष्ट्रगीत पालटण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून सामूहिक राष्ट्रगीत म्हटले, तसेच राष्ट्रध्वजही फडकावला.
प्रशासनातील अनेकांचे स्थानांतर
अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर विविध मंत्रालयांतील ३० सचिवांचे स्थानांतर करण्यात आले आहे. अनेक देशांतील बांगलादेशी राजदूतांना माघारी बोलावण्यात आले आहे किंवा काहींची सेवा समाप्त करण्यात आली आहे. सुमारे ५० हून अधिक विद्यापिठांचे कुलगुरु, निबंधक (रजिस्ट्रार), तसेच १४७ शाळा आणि महाविद्यालये यांच्या प्राचार्यांच्या जागी नवीन प्रचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाबांचलादेशात येणार्या काही दिवसांमध्ये शरीयत कायदा लागू झाल्यास आणि त्याचा वापर हिंदूंच्या विरोधात करून त्यांना नामशेष केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |