Greta Thunberg arrested : डेन्मार्कमध्ये गाझावरील आक्रमणाचा निषेध करणार्‍या ग्रेटा थनबर्गला अटक

कोपनहेगन विद्यापिठात घुसखोरी : इस्रायली विद्यापिठांसमवेतचे करार रहित करण्याची मागणी !

ग्रेटा थनबर्ग

कोपनहेगन (डेन्मार्क) – येथे गाझामधील युद्धाच्या विरोधात आंदोलन करणारी २१ वर्षीय कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) हिला डॅनिश पोलिसांनी अटक केली. या आंदोलनाचे आयोजन करणार्‍या विद्यार्थी गटाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, कोपनहेगन विद्यापिठात ४ सप्टेंबरला २० लोकांचा जमाव आंदोलन करत होता. त्यातील ३ लोक बलपूर्वक आतमध्ये घुसले. आंदोलकांनी कोपनहेगन विद्यापिठाने इस्रायली विद्यांपिठांसमवेतचे सर्व करार रहित करण्याची मागणी केली.

पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे उघड करण्यास नकार दिला; परंतु ‘स्टुडंट्स अगेन्स्ट द ऑक्युपेशन’च्या प्रवक्त्याने सांगितले की, अटक केलेल्यांमध्ये थनबर्ग हिचाही समावेश होता. ‘एकस्ट्रा ब्लेडेट’ या वृत्तवाहिनीने थनबर्गला अटक करतांनाचे छायाचित्र प्रसारित केले आहे.

संपादकीय भूमिका

भारत शासनाने केलेल्या तत्कालीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी खलिस्तानी आणि राष्ट्रद्रोही मुसलमान यांनी वर्ष २०२१ मध्ये देहलीत हिंसक आंदोलन केले होते. त्या वेळी याच ग्रेटा थनबर्ग हिने भारतविरोधी वक्तव्य करत हिंसक कृत्य करणार्‍यांचे उघडपणे समर्थन केले होते ! आताही ती गाझावरील आक्रमणावरून हमासच्या हिंसक आणि अमानवीय कृतीचे समर्थन करत आहे !