देवतांचे विडंबन करणार्‍या ‘संगीत वस्‍त्रहरण’ नाटकाच्‍या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्‍यात तक्रार !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुलुंड (मुंबई) – येथील ‘श्रीशिवकार्य प्रतिष्‍ठान’चे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री. प्रभाकर भोसले यांनी हिंदूंच्‍या देवतांचे विडंबन असणार्‍या ‘संगीत वस्‍त्रहरण’ या नाटकाच्‍या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्‍यात तक्रार केली आहे. त्‍यांनी २२ ऑगस्‍ट या दिवशी लिखित तक्रार मुलुंड पोलीस ठाण्‍यात दिली.

या नाटकामध्‍ये हिंदूंचा महान ग्रंथ महाभारतातील अनेक पात्रांचे विडंबन केले आहे. हे विडंबन आक्षेपार्ह आणि अवमानकारक आहे. महाभारत ग्रंथ आणि त्‍यातील महापुरुष हा हिंदूंसाठी श्रद्धेचा विषय आहे. त्‍यांचे या नाटकात विडंबन झाल्‍यामुळेे या नाटकाद्वारे हिंदूंंच्‍या भावना दुखावल्‍या गेल्‍याचे या तक्रारीत म्‍हटले आहे. श्री. प्रभाकर भोसले यांनी नुकतेच हे नाटक पाहिले असता वरील प्रकार त्‍यांच्‍या लक्षात आला.