RSS Annual Meeting : केरळमधील पलक्कड येथे यंदा रा.स्व.संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व सरकार्यवाह श्री. दत्तात्रेय होसबाळे

नागपूर –  स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक या वर्षी केरळमधील पलक्कड येथे ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. ही तीन दिवसीय बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते. मागील वर्षी या बैठकीचे आयोजन पुण्यात झाले होते. या बैठकीत संघप्रणीत विविध संघटनांमध्ये कार्यरत प्रमुख पदाधिकारी सहभागी होतात. या बैठकीत प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह श्री. दत्तात्रेय होसबाळे यांच्यासह संघाचे सर्व ६ सह सरकार्यवाह आणि अन्य प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.


यासह राष्ट्र सेविका समिति, वनवासी कल्याण आश्रम, विश्‍व हिंदु परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ यांच्यासह ३२ संघप्रणीत संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटन मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी सहभागी होतील, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली. या बैठकीत राष्ट्रीय हिताच्या विविध विषयांंवर चर्चा होणार आहे.