एम्. सखावत हुसेन यांना पदावरून हटवले !
नवी देहली – बांगलादेशातील ‘डेली स्टार’ या दैनिकाने प्रसारित केलेल्या वत्तपत्रानुसार (निवृत्त) ब्रिगेडियर जनरल एम्. सखावत हुसेन यांना देशातील अंतरिम सरकारमधील गृह मंत्रालयाच्या सल्लागार पदावरून हटवण्यात आले आहे. आता त्यांच्या जागी (निवृत्त) लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी यांना नियुक्त करण्यात आले आहे. जहांगीर यांच्यासह ४ नवीन सल्लागारांना पदाची शपथ देण्यात आली. महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने ४ मंत्रालये, तसेच राष्ट्रपती कार्यालयात करारावर ५ सचिवांची नियुक्ती केली आहे.
ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम्. सखावत यांना त्यांच्याच वक्तव्यावर बोट ठेवत गृह सल्लागार पदावरून हटवण्यात आले आहे. विद्यार्थी नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. यानंतर, बीएन्पी आणि त्यांच्या तीन सहकारी संघटनांनी त्यांचे त्यागपत्र मागितले होते.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील गृह सल्लागारपदी कुणाचीही नियुक्ती झाली, तरी तेथील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही, हेच खरे ! |