विदेशातील सायबर गुन्हेगारांना सिमकार्ड्स विकत असल्याचे उघड !
मंगळुरू (कर्नाटक) –विदेशात सायबर गुन्हेगारी करणार्यांसाठी सिमकार्ड्स गोळा करत असल्याच्या आरोपावरून मंगळुरू पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
महंमद समर (२६ वर्षे) आणि महंमद अझीम (१९ वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून एअरटेल आस्थापनाचे ८६ सिमकार्ड्स, २ भ्रमणभाष संच, १ चारचाकी गाडी यांसह ५ लाख ४९ सहस्र ३०० रुपये किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. हे आरोपी ओळखीतील लोकांना फसवून त्यांच्या नावावर भ्रमणभाष सिमकार्ड्स घेऊन ते विदेशातील सायबर गुन्हेगारांना विकत होते. आरोपींनी आतापर्यंत ४०० ते ५०० सिमकार्ड्स गोळा करून विदेशात पाठवली आहेत. (हे सुरक्षा यंत्रणांचे अपयश नव्हे का ? – संपादक)
धर्मस्थळ पोलिसांनी गेल्या फेब्रुवारीत ५ जणांना अटक करून त्यांच्याकडून ४२ सिमकार्ड्स जप्त केले होते. मंगळुरू शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा धर्मस्थळात अटक झालेल्या आरोपींशी संपर्क असल्याचे समजते.