Assembly Election Dates : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका घोषित

  • जम्मू-काश्मिरात १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या दिवशी मतदान

  • हरियाणात १ ऑक्टोबरला मतदान

  • ४ ऑक्टोबरला निकाल

नवी देहली – जम्मू-काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा ३ टप्प्यांत, तर हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला विधानसभांसाठी निवडणुका होणार आहेत. ४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने येथे पत्रकार परिषदेत केली. ११ डिसेंबर २०२३ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच जम्मू-काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा परत करावा, असेही म्हटले होते.

वर्ष २०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. वर्ष २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर येथे राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर तेथे उपराज्यपाल प्रशासक आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या ९० जागा आहेत. यातील ४७ काश्मीरमध्ये, तर ४३ जम्मूमध्ये आहेत.