जळगाव – काहीजण म्हणाले की, ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’चे पैसे परत घेतले जातील. अरे वेड्यांनो, भाऊबीज दिली, तर ती परत घेतली जात नाही. कुणाचा बापही लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नाही. कुणीही बहिणीचे प्रेम विकत घेऊ शकत नाही. प्रसंगी त्या उपाशी रहातील; मात्र भावाला जेवू घालतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. येथे ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या वतीने राबवण्यात येणार्या विविध योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने आवाहन केले. महायुतीचे सरकार सर्वांसाठी योजना राबवत असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील ४ वाहने एकमेकांना धडकली !
जळगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील ४ वाहनांचा अपघात झाला असून त्या एकमेकांना धडकल्या. या अपघातात कुणीही घायाळ झालेले नाही. वाहनांची किरकोळ हानी झालेली नाही. |