आसामच्या गृहसचिवांची आत्महत्या  

कर्करोगामुळे पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर काही मिनिटांतच संपवले स्वतःचेही जीवन !

आसामचे गृह आणि राजकीय सचिव शिलादित्य चेतिया

गौहत्ती – आसामचे गृह आणि राजकीय सचिव शिलादित्य चेतिया यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर काही मिनिटांतच आत्महत्या केली. त्यांची पत्नी कर्करोगाने त्रस्त होती. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर गौहत्ती येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. (शिक्षणात साधना हा विषय अंतर्भूत न केल्याने उच्च विद्याविभूषित व्यक्तीही कठीण परिस्थितीला धैर्याने तोंड देऊ शकत नाही, हेच या घटनेतून लक्षात येते ! यातून शिक्षणात साधना शिकवण्याचे महत्त्व अधोरेखित होते ! – संपादक)

१८ जून या दिवशी शिलादित्य चेतिया यांच्या ४० वर्षीय पत्नीचा कर्करोगामुळे रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर १० मिनिटांतच ४४ वर्षीय चेतिया यांनी स्वतःच्या पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पत्नीच्या आजारपणामुळे चेतिया हे गेल्या ४ मासांपासून रजेवर होते. चेतिया यांना राष्ट्रपती शौर्यपदकही मिळाले आहे.