‘पेठे ज्वेलर्स’च्या मालकांवर गुन्हा नोंद !

पुणे – अल्प रुपयांमध्ये हिर्‍यांचा नेकलेस आणि बांगड्या देतो, असे आमीष दाखवून ‘पेठे ज्वेलर्स’मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात ‘पेठे ज्वेलर्स’चे मालक पराग पेठे, तनय पेठे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.