Suresh Gopi : (म्हणे) ‘इंदिरा गांधी ‘मदर ऑफ इंडिया’ ! – केंद्रीय मंत्री सुरेश गोपी

भाजपचे केरळमधून निवडून आलेले केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांचे विधान

केंद्रीय मंत्री सुरेश गोपी

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देणारे आणि केंद्रात मंत्री बनणारे सुरेश गोपी यांनी इंदिरा गांधी यांना ‘मदर ऑफ इंडिया’ असे म्हटले आहे. तसेच केरळचे दिवंगत माजी मुख्यमंत्री के. करुणाकरण यांना ‘उत्तम प्रशासक’ म्हटले आहे. यासह सुरेश गोपी यांनी ज्येष्ठ मार्क्सवादी नेते ई.के. नयनार यांना त्यांचेे ‘राजकीय गुरु’ असे संबोधले आहे. ‘केरळमधील के. करुणाकरण आणि ई.के. नयनार या दोन्ही नेत्यांचा माझ्या राजकीय वाटचालीवर प्रभाव आहे’, असे  सुरेश गोपी यांनी म्हटले. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुरेश गोपी यांनी केरळमधील पुनकुन्नम् येथील करुणाकरण यांच्या ‘मुरली मंदिर’ या स्मारकाला भेट दिली. त्या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संपादकीय भूमिका

  • गोहत्या बंदीच्या मागणीसाठी देहलीतील संसद भवनाबाहेर अहिंसक मार्गाने आंदोलन करणार्‍या साधू संतांवर गोळीबार करण्याचा आदेश देणार्‍या इंदिरा गांधी कधी तरी ‘मदर ऑफ इंडिया’ असू शकतात का ?
  •  ‘भाजपचे असतांनाही सुरेश गोपी यांचा केरळमध्ये विजय का झाला ?’ याचे उत्तर या विधानातून मिळते, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?