नागपूर – नागपूर मध्यवर्ती कारागृहात २ गटांत वाद निर्माण होऊन कारागृहातच हाणामारी झाली. एका बंदीवानाच्या प्रेयसीविषयी दुसर्या बंदीवानाने अपशब्द वापरल्याने त्यांच्यात भांडण होऊन हाणामारी झाली. यात ३ बंदीवान घायाळ झाले असून सूरज कार्लेवार, महंमद शाकिब अन्सारी आणि वृषभ कावळे अशी या तिघांची नावे आहेत. या प्रकारात कारागृहातील साहित्याचीही तोडफोड झाली आहे. या प्रकरणी ७ बंदीवानांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाकारागृहातच असे प्रकार होऊ लागले, तर कारागृहात डांबण्याच्या शिक्षेचा उपयोगच काय ? असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कारागृह प्रशासनाने कठोर उपाय करायला हवेत ! |