Gaza Ceasefire : हमासचा युद्धविरामाचा प्रस्ताव इस्रायलने धुडकावला !

ओलिसांची सुटका करण्याचा प्रस्ताव हमासने फेटाळला !

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने हमासचा युद्धविरामाचा ताजा प्रस्ताव धुडकावला आहे. हमासने कतारच्या मध्यस्थांच्या माध्यमांतून हा प्रस्ताव मांडला होता. ‘युद्धविरामासह इस्रायली सैन्याने गाझामधून संपूर्ण माघार घ्यावी’, असे या प्रस्तावात म्हटले होते. एका इस्रायली अधिकार्‍याने सांगितले की, हमासनेही इस्रायली ओलिसांची सुटका करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे.