आनंदी आणि सतत कृतज्ञताभावात असलेल्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले (वय ४१ वर्षे) !

ज्येष्ठ शुक्ल षष्ठी (१२.६.२०२४) या दिवशी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना ४१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. सकारात्मक आणि आनंदी राहून साधकांना आधार देणे

श्री. निषाद देशमुख

‘सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा करणार्‍या साधकांवर सूक्ष्मातील वाईट शक्ती पुष्कळ आक्रमणे करतात. त्यामुळे मधुराताईंची प्राणशक्ती अल्प असते. असे असूनही त्या पुष्कळ सकारात्मक आणि आनंदी असतात. त्यांच्याशी बोलल्यावर साधकांना साधना करण्यासाठी उभारी मिळते आणि साधकांना त्यांचा आधार वाटतो.

२. प्रीती

मधुराताईंमधील ‘प्रीती’ या गुणांमुळे अनेक साधक त्यांना भेटायला आवर्जून येतात. वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाची सांगता झाल्यानंतर अनेक साधक मधुराताईंना भेटायला आले होते. अत्यंत व्यस्त कार्यक्रम असला, तरीही अनेक साधक मधुराताईंना भेटतात आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतात. अनेक वर्षांपूर्वी मधुराताईंना एकदाच भेटलेले साधकही त्यांना भेटायला येतात.

३. इतरांना साधनेत साहाय्य करणे

मधुराताईंना नामजपादी उपाय, साधना किंवा सूक्ष्म ज्ञान मिळवण्याची सेवा या संदर्भात काही वैशिष्ट्यपूर्ण आणि नवीन सूत्र लक्षात आल्यास त्याविषयी त्या आवर्जून सांगतात. त्यामुळे मला सूक्ष्म ज्ञान मिळवण्याची सेवा करण्याचा आणि शिकण्याचा उत्साह येतो.

४. नेतृत्वगुण

आम्हा तिन्ही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना (मी, श्री. राम होनप आणि मधुराताई यांना) एकत्रितपणे एखादी सेवा करायची असल्यास, त्या संदर्भात मधुराताई बुद्धी आणि भाव या दोन्ही स्तरांशी निगडित तपशीलवार सूत्रे सांगतात, उदा. ज्या ठिकाणी सूक्ष्म-परीक्षण करायचे आहे, तिथे बसण्याची व्यवस्था, सेवेच्या संदर्भात गुरुदेवांनी किंवा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले सूत्र, लेख कधीपर्यंत पाठवणे अपेक्षित आहे, लेख किती मोठा असावा ? इत्यादी. यामुळे आम्हाला फारसा विचार न करता व्यवस्थित नियोजन करणे सोपे होते. आमच्याकडून एखादे सूत्र प्रलंबित राहिल्यास मधुराताई त्याची आम्हाला जाणीव करून देतात. त्यामुळे आम्हाला समयमर्यादेत परिपूर्ण सेवा करणे शक्य होते.

५. कृतज्ञताभावात रहाणे

पूर्वीच्या तुलनेत ‘मधुराताई अधिक प्रमाणात कृतज्ञताभावात असतात’, असे मला जाणवते. त्यांना होत असलेल्या आध्यात्मिक त्रासामुळे त्यांना कधी-कधी सेवा करता येत नाही. त्या वेळी त्यांचे त्याविषयी गार्‍हाणे नसते. ‘देवाच्या कृपेने त्रास दूर होण्यासाठी नामजपादी उपाय आणि संतांचे मार्गदर्शन मिळते’, याबद्दल त्या कृतज्ञता व्यक्त करतात. मी त्यांच्याशी भ्रमणभाषवर अनौपचारिक बोलत असतांना त्या ‘देवाच्या कृपेने सत्संग मिळाला’, असे म्हणून कृतज्ञता व्यक्त करतात.’

– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२४)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.