‘ऑन ड्युटी’ मद्याचे सेवन केले जाते का ? – वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात मद्याच्या बाटल्यांचा खच !

विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार

पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात मद्याच्या बाटल्यांचा खच असलेला व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे पुणे पोलीस आयुक्तालयात ‘ऑन ड्युटी’ (कर्तव्यावर असतांना) मद्याचे सेवन केले जाते का ? असा संतप्त प्रश्न विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारातच या मद्याच्या बाटल्यांचा खच सापडल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या व्हिडिओची नोंद घेऊन पोलीस आयुक्तांनी चौकशी करावी आणि याविषयी पूर्ण खुलासा पुणेकरांसमोर मांडावा.