सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा शरणागतभाव !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. साधिकेला स्वप्नात आपत्काळाविषयीचे दृश्य दिसणे आणि ‘त्याच वेळी आशीर्वादाच्या मुद्रेतील श्रीरामाच्या रूपातील गुरुदेव अन् त्यांच्याजवळ सोनेरी मुकुट घातलेली एक व्यक्ती हाताची मुद्रा करून सर्व कार्यभार सांभाळत आहे’, असे दिसणे

‘३१.१०.२०२१ या दिवशी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे फरीदाबाद येथे आले होते. त्याच दिवशी सकाळी मला एक स्वप्न पडले. मला स्वप्नात दिसले, ‘चहूबाजूंनी जोराचा पाऊस पडत आहे आणि वेगाने वादळ येत आहे. गाड्या पाण्यात बुडत आहेत. सर्व बाजूला पाणीच पाणी दिसत आहे. श्रीरामाच्या रूपात गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आशीर्वादाच्या मुद्रेत सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांच्याजवळ सिंहासनावर दुसरी व्यक्ती बसली आहे; परंतु मला त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता. त्या व्यक्तीने सोनेरी मुकुट घातला होता. ती व्यक्ती हाताची मुद्रा करून सर्व कार्यभार सांभाळत होती. ती व्यक्ती हवेत हात फिरवून आपत्कालीन स्थिती नियंत्रणाखाली आणत होती.’

 २. साधिकेने सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना स्वप्नाविषयी सांगितले असता त्यांनी ‘श्रीरामाच्या (गुरुदेवांच्या) शेजारी सिंहासनावर बसलेली व्यक्ती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ याच असू शकतात’, असे सांगणे

मी या स्वप्नाविषयी सद्गुरु पिंगळेकाकांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘भगवान श्रीराम (गुरुदेव) त्या सिंहासनावर विराजमान  झालेले आहेत. तुम्हाला ती दुसरी व्यक्ती भगवान श्रीरामाच्या चरणांशी बसलेली दिसली असती, तर ती व्यक्ती म्हणजे मी स्वतः असतो; परंतु ती व्यक्ती श्रीरामाच्या शेजारी सिंहासनावर बसलेली दिसली, म्हणजे त्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ याच असू शकतात.’’

– श्रीमती पूनम अरोरा, फरीदाबाद (९.७.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक