ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना काही प्रश्‍नांची उत्तरे देता न येण्‍यामागील कारणे,  त्‍यांना येत असलेली मर्यादा आणि ती दूर होण्‍यासाठी त्‍यांनी करावयाची साधना !

प्रश्‍न – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मी ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना विविध विषयांवर प्रश्‍न विचारतो. त्‍यातील काही प्रश्‍नांची उत्तरे ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक देऊ शकतात, तर काही प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकत नाहीत. याचे कारण काय ? त्‍यांना ज्ञान प्राप्‍त करण्‍यात काही अडथळे येतात कि ज्ञानप्राप्‍तकर्त्‍यांची उत्तरे मिळवण्‍याविषयी काही मर्यादा आहेत ? मर्यादा असल्‍यास त्‍या दूर करण्‍यासाठी साधकांनी कोणती साधना केली पाहिजे ? (२७.५.२०२३)

॥ श्री गुरवे नम: ॥

१. ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना काही प्रश्‍नांची उत्तरे देता न येण्‍यामागील कारणमीमांसा

२. ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांची उत्तर मिळणे किंवा न मिळणे याची कारणमीमांसा

श्री. निषाद देशमुख

डिसेंबर २०१६ पासून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मला ज्ञानप्राप्‍ती होण्‍यासाठी विविध प्रश्‍न देत आहेत. ‘त्‍यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांची उत्तरे मिळणे किंवा न मिळणे, यामागे माझी आध्‍यात्मिक स्‍थिती कारणीभूत आहे’, असे मला जाणवते.

माझी आध्‍यात्मिक स्‍थिती (माझ्‍यातील स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍यात वाढ न होणे, वाईट शक्‍तींचे त्रास अल्‍प असणे आणि परेच्‍छा, प्रेमभाव अन् भाव या स्‍तरांवर वागता येणे) चांगली असली, तर त्‍यांनी विचारलेल्‍या प्रत्‍येक प्रश्‍नाचे उत्तर मला मिळतेच. ते उत्तर कनिष्‍ठ पातळीचे असू शकते किंवा अयोग्‍य असू शकते; पण उत्तर मिळते. याउलट माझ्‍या आध्‍यात्मिक स्‍थितीत घसरण झाली, म्‍हणजे माझ्‍यातील स्‍वभावदोष, अहं आणि वाईट शक्‍तींची आक्रमणे यांच्‍यात वाढ झाली अन् भावजागृती, परेच्‍छेने वागणे इत्‍यादी साधनेचे प्रयत्न अल्‍प झाले, तर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगूनही मला ज्ञान मिळत नाही.

३. ज्ञानप्राप्‍तकर्ते श्री. निषाद देशमुख यांच्‍यातील स्‍वभावदोष, अहं आणि त्‍यांची स्‍वेच्‍छा यांत वाढ झाल्‍यावर, तसेच त्‍यांना होणार्‍या वाईट शक्‍तींच्‍या त्रासांत वाढ झाल्‍यावर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगूनही त्‍यांना ज्ञान न मिळणे

३ अ. डिसेंबर २०१९ पासून आध्‍यात्मिक त्रासांत वाढ होणे : डिसेंबर २०१९ पासून मला वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांमुळे पुष्‍कळ त्रास होऊ लागले, उदा. रात्री झोप न येणे, थकवा जाणवणे, शरिरातील पित्ताचे प्रमाण वाढणे, अपचनाचा त्रास होणे इत्‍यादी. किन्‍नीगोळी (कर्नाटक) येथील संत प.पू. देवबाबा यांनी माझ्‍यासाठी आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केले. त्‍यामुळे मला होणार्‍या त्रासाचे प्रमाण थोडे न्‍यून झाले.

३ आ. एप्रिल २०२० मध्‍ये चुकीचे ज्ञान मिळत असल्‍याने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ज्ञान न घेण्‍यास सांगणे : एप्रिल २०२० मध्‍ये माझ्‍या त्रासांत वाढ होऊन मला चुकीचे ज्ञान मिळण्‍याच्‍या प्रमाणातही वाढ झाली. त्‍यामुळे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पहिले काही आठवडे मला ज्ञानप्राप्‍तीची सेवा न करण्‍यास सांगितले. त्‍यानंतर मी त्‍यांना काही ज्ञानाच्‍या धारिका वाचायला दिल्‍या. त्‍यांत पुष्‍कळ त्रासदायक शक्‍ती असल्‍यामुळे त्‍यांनी काही मास मला केवळ नामजपादी उपाय करायला सांगितले.

३ इ. सप्‍टेंबर २०२० मध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘तुझा आध्‍यात्मिक त्रास न्‍यून झाला आहे’, असे सांगणे; पण मनाची नकारात्‍मक स्‍थिती आणि अहं यांमुळे ज्ञान न मिळणे : सप्‍टेंबर २०२० मध्‍ये सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला सांगितले, ‘‘तुझा आध्‍यात्मिक त्रास न्‍यून झाला आहे. तुला मध्‍यम स्‍वरूपाचा आध्‍यात्मिक त्रास आहे.’’ सप्‍टेंबर २०२० नंतर त्‍यांनी मला ज्ञानप्राप्‍तीसाठी काही प्रश्‍न दिले. त्‍या वेळी ते प्रश्‍न वाचून मला त्‍याची उत्तरे देता आली नाहीत. मी २ – ३ दिवस सलग प्रयत्न केले आणि त्‍यानंतर ‘उत्तरे मिळत नाहीत’, असा निरोप पाठवला. माझी ही स्‍थिती नोव्‍हेंबर २०२१ पर्यंत होती.

३ इ १. या संदर्भात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला कळवले, ‘‘हा ज्ञानप्राप्‍तीचा पुढचा टप्‍पा आहे. काळजी करू नये.’’

३ ई. ज्ञानप्राप्‍तीच्‍या संदर्भात मनात आलेले विचार आणि त्‍यातून लक्षात आलेले स्‍वतःतील स्‍वभावदोष अन् अहंचे पैलू : या वेळी ‘ज्ञान का मिळत नाही ?’, ते माझ्‍या लक्षात आले नाही; पण त्‍या वेळी माझ्‍यातील स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे माझ्‍या मनात ज्ञानप्राप्‍तीच्‍या संदर्भात पुढील नकारात्‍मक विचार येत असत.

१. ज्ञानप्राप्‍तीची फलनिष्‍पत्ती काहीच नाही. सूक्ष्मातून मिळणारे ज्ञान वाचून एका तरी साधकाची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के झाली आहे का ? किंवा साधकाने संतपद गाठले आहे का ? या प्रसंगात माझ्‍या मनात ‘साधकांच्‍या आध्‍यात्मिक उन्‍नतीसाठी ईश्‍वरी ज्ञानाचा वापर व्‍हावा’, अशी अपेक्षा होती. अनेक संत आणि साधक यांच्‍या मते ‘अपेक्षा’ हा अहंचा पैलू आहे.

अ. ‘अपेक्षा करणे’ हे अहंचे लक्षण आहे. – सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

आ. ‘माझ्‍या मनाला अनुकूल अशी कृती इतरांनी करायला हवी’, असा विचार मनात येणे, म्‍हणजे अपेक्षा करणे. – श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

२. पुष्‍कळ कष्‍ट घेऊन लिहून दिले, तरीही ज्ञानाविषयीचे सर्वच लिखाण कुठे प्रकाशित होते ? मिळालेल्‍या ज्ञानाच्‍या तुलनेत २० ते ३० टक्‍के इतकेच ज्ञानाविषयीचे लिखाण प्रसिद्ध होते. मग कष्‍ट घेऊन लिहून देण्‍याची काय आवश्‍यकता ? (स्‍वभावदोष आणि अहंचा पैलू : अपेक्षा करणे, मनानुसार करणे)

३. ज्ञानातून समजलेले उपाय इत्‍यादी संदर्भातील सूत्रे त्रोटक असतात. त्‍या तुलनेत संतांनी सांगितलेली माहिती किंवा उपाय उत्तम आणि परिणामकारक असतात. मग ते ज्ञान कशाला लिहून घ्‍यायला हवे ? (स्‍वभावदोष : शिकण्‍याची वृत्ती नसणे, सवलत घेणे, अहंचा पैलू, न्‍यूनगंड वाटणे)

४. श्री. राम होनप, सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) आणि मला मिळणार्‍या ज्ञानातील ७० ते ८० टक्‍के भाग समान असतो. आम्‍ही तिघेही एकच सूत्र पुनःपुन्‍हा सांगत असतो. हे पुनःपुन्‍हा एकच कार्य करण्‍यासारखे आहे. श्री. राम होनप आणि सुश्री (कु.) मधुरा भोसले लिहून देतील. मला पुष्‍कळ लिहिण्‍याची आवश्‍यकता नाही. (स्‍वभावदोष : इतरांकडून अपेक्षा करणे, आळस आणि सवलत घेणे)

५. सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सप्‍तलोकांतील ज्ञान मिळते, तर श्री. राम होनप यांना ‘सप्‍तपाताळांत सूक्ष्मातून काय घडत आहे’, त्‍याविषयी समजते. सप्‍तलोक आणि सप्‍तपाताळ म्‍हणजे ब्रह्मांड. त्‍यांना संपूर्ण ब्रह्मांडाविषयी ज्ञान मिळते. मला ना सप्‍तलोकाविषयी पूर्ण ज्ञान मिळते, ना सप्‍तपाताळाविषयी पूर्ण ज्ञान मिळते. मग मी ज्ञान मिळवण्‍यासाठी कशाला प्रयत्न करायचे ?’ (स्‍वभावदोष : इतरांचा हेवा वाटणे, स्‍वतःला न्‍यून लेखणे)

– श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.५.२०२३, सकाळी ७ ते ९.३५) ॐ(क्रमशः)

॥ श्री गुरवे नम: ॥

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.