१. स्वाती सयाजी पाटील (संस्थापक अध्यक्ष, लोक जागृती सामाजिक संस्था), मुंबई, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रम पहातांना मला अनेक गोष्टींचे ज्ञान मिळाले. माझ्या मनाला शांती वाटली.
आ. या आध्यात्मिक वास्तूमध्ये फिरतांना एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्याचे मला जाणवले. धन्यवाद !’
२. श्री. सुभाष पु. अहिर (कोषाध्यक्ष, भूमीपुत्र सामाजिक संस्था), मुंबई, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रम पाहून मनात सात्त्विक भाव निर्माण होत आहे’, असे मला वाटले.’
३. श्री. महेंद्र पाटील (संस्थापक अध्यक्ष, भूमीपुत्र धर्माभिमानी महासंघ), ठाणे, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रम पाहून या आश्रमाद्वारे समर्पित भावनेने धर्मकार्य घडत असल्याचा आनंद वाटला.
आ. संस्कृती जतनाचे महत्त्वाचे कार्य आश्रमाद्वारे घडत आहे. ‘हे कार्य संपूर्ण विश्वामध्ये पोचून संपूर्ण विश्व हिंदु बनावे’, यासाठी शुभेच्छा !’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |