अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त !

उद्योजक राज कुंद्रा

मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा उद्योजक पती राज कुंद्रा यांच्या मालकीची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) जप्त केली आहे. यामध्ये शिल्पा यांच्या नावावर असलेल्या जुहूतील घराचाही समावेश आहे. त्या दोघांचा पुण्यातील बंगला आणि राज कुंद्राच्या नावावर असलेले शेअर्सही जप्त करण्यात आले आहेत. पी.एम्.एल्.ए. कायदा २००२च्या प्रावधानांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.