UK Hindu Temples Budget : ब्रिटनमधील ४०० हिंदु मंदिरांच्या सुरक्षेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद !

हिंदु मंदिरांपेक्षा इस्लामी संस्थांना दिलेला निधी अधिक  

लंडन (ब्रिटन) – ब्रिटन सरकारने हिंदूंच्या मागणीनंतर देशातील मंदिरांच्या सुरक्षेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये ४०० हून अधिक हिंदु मंदिरे आहेत. सरकारने दिलेल्या निधीतून या मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. तसेच मंदिरांवरील आक्रमणांच्या प्रकरणांना कसे सामोरे जावे, याचे प्रशिक्षण पोलिसांना देण्यासाठी हा पैसा खर्च केला जाणार आहे. वर्ष २०२२ मध्ये ब्रिटनमध्ये अनेक मंदिरांना लक्ष्य करण्यात आले होते.

धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी निधी देण्यामध्ये होत आहे भेदभाव !

२ वर्षांपूर्वी ब्रिटीश सरकारने ३०० कोटी रुपयांची धार्मिक स्थळ सुरक्षा निधी योजना घोषित केली होती. यांतील बहुतांश पैसा इस्लामी संस्थांवर खर्च करण्यात आला, तर अन्य धर्मियांसाठी केवळ ३५ कोटी रुपये देण्यात आले. यांपैकी गुरुद्वारांना ७ कोटी, तर हिंदूंच्या मंदिरांना अडीच कोटी रुपये मिळाले. त्यामुळे ब्रिटनमधील हिंदूंमध्ये नाराजी आहे. ‘धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी निधी देण्यात भेदभाव करणे योग्य नाही’, असे अनेक हिंदूंचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

इस्लामी संस्थांसाठी २०० हून अधिक कोटी रुपये खर्च केले जात असतांना ४०० मंदिरांच्या सुरक्षेसाठी केवळ ५० कोटी रुपये ही अत्यंत अल्प तरतूद आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याचा विचार करणे आवश्यक आहे.