Namaz In Classroom : सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांनी अनुमतीविना वर्गातच केले नमाजपठण !

  • इतर विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतरही महाविद्यालय प्रशासन ढिम्म !

  • …तर हिंदूही वर्गात धार्मिक उपक्रम चालू करतील !  विश्‍व हिंदु परिषद

सोलापूर : येथील एक व्हिडिओ २४ मार्चला प्रसारित झाला, ज्यामध्ये अनेक मुसलमान विद्यार्थी शासकीय महाविद्यालयाच्या वर्गात नमाजपठण करतांना दिसत होते. रमजानच्या काळात २१ आणि २२ मार्चला सोलापूरमधील शासकीय तंत्रनिकेतन  महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी नमाजपठण केले. इतर विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी करूनही महाविद्यालय प्रशासनाने नमाजपठण करणार्‍या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. ‘आता त्यांनी अनुमतीविना महाविद्यालयाच्या आवारात नमाजपठण करणे चालू केले आहे, ही गंभीर गोष्ट आहे’, असे तेथील अन्य विद्यार्थ्यांनी सांगितले.

अ.भा.वि.प.चा विरोध !

मुसलमान विद्यार्थ्यांनी आधी रमजानच्या नमाजासाठी महाविद्यालयातून लवकर सोडण्याची अनुमती महाविद्यालयाच्या अधिकार्‍यांकडे मागितली होती; मात्र महाविद्यालयाने नियमांचे कारण देत त्यांना सोडले नाही. यानंतर या विद्यार्थ्यांनी वर्गातच नमाजपठण केले. इतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, तसेच विश्‍व हिंदु परिषद आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेविरोधात आवाज उठवला. नमाज प्रथा बंद न केल्यास वर्गात हिंदूही धार्मिक उपक्रम चालू करतील, अशी चेतावणी कार्यकर्त्यांनी दिली; मात्र तरीही अधिकार्‍यांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.

संपादकीय भूमिका

  • ‘कुठेही नमाजपठण केले, तरी काहीही कारवाई होत नाही’, हे ठाऊक असल्यामुळे अशा घटना घडत आहेत. त्या रोखायच्या असतील, तर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे !
  • वर्गात श्री सरस्वतीदेवीचे छायाचित्र ठेवण्याला कडाडून विरोध करणारे पुरो(अधो)गामी वर्गात नमाजपठण करणार्‍यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !