वर्ष १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर वर्ष १९५१-५२ मध्ये पहिली लोकसभा निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीचा एकूण व्यय १० कोटी ५ लाख रुपये, तर वर्ष २०१९ मध्ये व्ययाची ही रक्कम ६ सहस्र ५०० कोटी रुपयांपर्यंत पोचली. कोणत्या वर्षी किती रुपये व्यय झाले ? त्याचा हा संक्षिप्त आढावा येथे देत आहोत.
(साभार : विविध संकेतस्थळे)
निवडणुकांसाठी व्यय वाढण्यामागील कारण
लोकसभा निवडणुकीसाठी इतका व्यय का होतो ? याची अनेक कारणे आहेत. मतदार आणि मतदारसंघ यांची वाढती संख्या यांमुळेही व्यय वाढत आहे. पहिल्या लोकसभा निवडणुकीत ५३ पक्ष आणि १ सहस्र ८७४ उमेदवार, तर वर्ष २०१९ मध्ये ६७३ पक्ष अन् उमेदवारांची संख्या ८ सहस्र ५४ इतकी होती. (देशात अर्धी जनता भुकेली रहात असतांना एवढा व्यय करणे कितपत योग्य ? – संपादक)