आयकर खात्याला निवडणुकीत कुठे पैसे वाटले जात आहेत का ? हे पहाण्यासाठी २४ घंटे कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करावा लागणे, हे भारताला लज्जास्पद ! जगात किती देशांत अशी स्थिती आहे ?

‘लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर रोखण्यासाठी आयकर खाते सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर खात्याने २४ घंटे चालू रहाणारा नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. ‘लोकांना कुठेही पैसे वाटण्यात येत असल्यास किंवा भेटवस्तू वितरित केली जात असल्यास त्याची माहिती आयकर विभागाच्या पणजी येथील नियंत्रण कक्षात माहिती द्यावी’, असे आवाहन आयकर खात्याने केले आहे. आयकर खात्याने माहिती देणार्‍याला त्याची ओळख गोपनीय ठेवण्यास मुभा दिली आहे.’ (२३.३.२०२४)