Telangana Holi Islamists Attack : तेलंगाणामध्ये होळी साजरी करणार्‍या हिंदूंवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

नमाजाच्या वेळी ध्वनीक्षेपकावर गाणी लावल्याने आक्रमण

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगणातील मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यातील चेंगीचेर्ला भागात होळीचा सण साजरा करत असतांना धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. येथील मशिदीजवळ होळी पेटवल्यानंतर नमाजपठणाच्या वेळी ध्वनीक्षेपकावर गाणी लावल्यावरून ही घटना घडली. यात महिलांसह अनेक लोक घायाळ झाले. ही घटना २४ मार्चला सायंकाळी घडली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला.

ए.एन्.आय. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, चेंगीचेर्लाच्या ब्रास बस्तीमध्ये होळी साजरी करतांना काही लोकांनी ध्वनीक्षेपक लावला होता. तेव्हा अन्य काही लोकांनी तो बंद करण्यास सांगितले, ज्यामुळे वाद झाला आणि त्यातून आक्रमणाची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

दारूच्या दुकानात चोरी !

दुसरीकडे तेलंगाणातील खम्मम भागातील टेकुलापल्ली परिसरातील दारूच्या दुकानांवर आक्रमण करून तेथून दारूच्या पेट्या पळवून नेण्यात आल्या. यामध्ये महिलांचाही सहभाग होता. त्या दारूच्या पेट्या पळवतांना दिसत होत्या. अनुमाने १५ ते २० लाख रुपयांची दारू चोरून नेल्याचा आरोप दुकानमालकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. (भारतियांची रसतळाला गेलेली नैतिकता ! या स्थितीला स्वातंत्र्यानंतरचे सर्व शासनकर्तेच उत्तरदायी आहेत ! – संपादक)

(सौजन्य : Republic Bharat)

संपादकीय भूमिका

  • प्रतिदिन दिवसांतून ५ वेळा देशभरात मशिदींवरील भोंग्यांवरून हिंदूंना अनावश्यक अजान ऐकवली जात असतांना हिंदू ते जर ऐकून घेत असतील, तर अन्य धर्मियांनी हिंदूंच्या सणांच्या वेळी लावण्यात येणारी गाणीही ऐकली पाहिजेत, असे कुणाला वाटत असेल, तर ते चुकीचे कसे ?
  • तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेचचच हिंदूंवर आक्रमण करण्याच्या घटना चालू झाल्या, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंनी लक्षात घ्यावे !